नाशिक

अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त

CD
फोटो : A15017 भारतनगर : अजमेरी बेकरीवर कारवाई करत अन्नसाठा जप्त करताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी -- अजमेरी बेकरीवर धडक कारवाई १५१ किलो केक जप्त; व्यवसाय बंद करण्याची नोटीस सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १५ : अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाच्या धडक कारवाईत वडाळा रोड भारतनगर येथील मे. अजमेरी बेकरीवर धडक कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक परवाना नसल्याचे आणि उत्पादन आणि साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने १५१ किलो केक आणि कपकेक जप्त करण्यात आले. संबंधित बेकरीला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली. ‘फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६’ या विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त अन्न व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमामे यांच्या पथकाने तपासणी करत कारवाई केली. तपासणीमध्ये अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे तसेच उत्पादन आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित असण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने कारवाई केली. कारवाईदरम्यान ३५ हजार ७५० रुपयांचे १४३ किलो केक, तसेच १२ हजार २४० रुपयांचे आठ किलो कपकेक, असा सुमारे ४७ हजार ९९० रुपयांचा १५१ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा नष्ट करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT