नाशिक

अक्कलकुवा-अक्राणीतील पाणीटंचाई उपाययोजनांना गती द्यावी

CD
(टुडे पान एकला मेन) फोटो : NSK26H31681 मुंबई : येथे मंत्रालयात आयोजित बैठकीला उपस्थित गुलाबराव पाटील, आमश्‍या पाडवी, पराग जैन, दीपाली देशपांडे आदी. -------------- अक्कलकुवा- अक्राणीतील पाणीटंचाई उपाययोजनांना गती द्यावी गुलाबराव पाटील : आढावा बैठकीत पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ८ : जिल्ह्यातील अक्कलकुवा-अक्राणीतील नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित योजनांना गती द्यावी. तसेच, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर आणि वितरण व्यवस्था सक्षम करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. दोन्ही तालुक्यांतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची प्रगती आणि पाणीटंचाईग्रस्त भागांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला. मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस आमदार आमश्या पाडवी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटिया, जल जीवन मिशनच्या अतिरिक्त सह अभियान संचालक दीपाली देशपांडे- सावेडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. अक्कलकुवा व अक्राणी हे तालुके भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ आणि दुर्गम असून, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पाणी साठवण क्षमता मर्यादित तसेच भूजल पुनर्भरण कमी असल्याने काही भागांत सुरक्षित व शाश्वत पाणीपुरवठ्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांमध्ये जलस्रोत, जलसाठवण, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग व्यवस्था आणि वितरण यंत्रणा यात प्रभावी समन्वय साधण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश आगामी काळात संबंधित यंत्रणांनी सजग राहून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावीत. या योजनांची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होऊन टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक पाणीपुरवठा योजनांची किरकोळ स्वरूपाची शिल्लक कामे पूर्ण करून योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळवून देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. ------- दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई पाणीपुरवठा योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर विनाविलंब कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. आवश्यकता भासल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. योजनांची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. प्रस्तावित प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील वंचित व दुर्गम वस्त्यांचाही समावेश प्राधान्याने करावा. कमी पाणी देणाऱ्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या ५९४ वसाहतींसाठी विशेष उपाययोजना आखाव्या. तसेच, वंचित वस्त्यांना सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना आखण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT