aakansha garud esakal
नाशिक

मोलमजुरी करत आकांक्षाची गरुड भरारी! जिद्दीच्या बळावर प्रथम

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : वडील पेंटर काम करतात तर आई इतरांच्या शेतात मोलमजुरी..., घरची परिस्थिती बेताचीच असे असले तरी कधी आई-वडिलांना (parents) मदत करत तर कधी घरातील सर्व कामाच्या जबाबदाऱ्या पेलवत आकांक्षा गरुड (akanksha garud) या विद्यार्थिनीने (HSC result 2021) 85 टक्के मिळवत जिद्दीच्या बळावर सावरगाव विद्यालय प्रथम क्रमांक मिळविला आहे.

यशाला गवसणी घालण्याचा चंग बांधला

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत आकांक्षाने प्रथम क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आई- वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तिने कधी शेतात तर कधी घरची जबाबदारी स्वीकारत अकरावीपासूनच यशाला गवसणी घालण्याचा चंग बांधला व यश मिळवले आहे. बारावीचे वर्ष असल्याने आई-वडिलांना मदतीचा हात देत ती घरातील आईच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करायची. उरलेल्या वेळात अभ्यास करून हे यश तिने मिळविले आहे. विशेष म्हणजे दहावीला देखील तिला ८५ टक्के गुण होते. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने हे यश मिळविले आहे. यापुढे पोलीस होऊन कुटुंबाला आधार देत स्पर्धा परीक्षा देऊन तिला या क्षेत्रात करिअर करायचे आहे, यासाठी तिने अकॅडमी जॉईन केली आहे.

सोनाली दिवेकर हीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शेतकरी कुटुंबातील सोनालीने अनकुटे येथून सावरगावला शाळेत येते तिनेही जिद्दीच्या बळावर ८२.०५ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांक सलमा तांबोळी (८२ टक्के) हिने संपादन केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सरचिटणीस प्रमोददादा पाटील, सहसचिव प्रविणदादा पाटील, युवा नेत संभाजीराजे पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, पर्यवेक्षक व्ही. एन. दराडे, ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, साहेबराव घुगे, व्ही. एस. विंचू, उमाकांत आहेर, यशवंत दराडे, नामदेव पवार, पोपट भाटे, राजकुवर परदेशी, योगेश भालेराव, कैलास मोरे, रवींद्र दाभाडे, संजय बहिरम, भाग्यश्री सोनवणे, प्रमोद दाणे, उज्वला आहेर, लक्ष्मण माळी, सगुना काळे, योगेश पवार, विकास व्यापारे, ऋषिकेश काटे, मयुरेश पैठणकर, रोहित गरुड, सुनील चौधरी, अरूण नागरे, मच्छिंद्र बोडके, लक्ष्मण सांगळे आदीनी अभिनंदन केले.

आमच्या सर्वच विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी असले तरी ते होतकरू असल्याने शिक्षकांकडून त्यांची सर्वतोपरी तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना आम्ही स्पर्धा परीक्षाची पुस्तके उपलब्ध करून देतो तसेच विविध नोकरी भरतीबाबत मार्गदर्शन केले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, त्याचमुळे विद्यालयाचा नावलौकिक झाला आहे. उत्कृष्ठ निकालाची परंपरा जपली आहे. - प्रमोददादा पाटील, सरचिटणीस, शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसूल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT