नाशिक

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

CD
NSK26H35265 : आकांक्षा म्‍हेत्रे राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकांक्षा म्हेत्रेने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. एलिट वुमन टीम स्प्रिंट या प्रकारात तिने १ मिनिट १२.६२० सेकंदांची वेळ नोंदवत पदकाला गवसणी घातली. आकांक्षा ही जैन इरिगेशनचे जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि झारखंड सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या फेरीत १० राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी आठ संघांनी पात्रता फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या अटीतटीच्या स्पर्धेत रेल्वे सर्व्हिसेस संघाने १:०९.९६६ वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या आकांक्षाने १:१२.६२० वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. झारखंडच्या संघाने १:१२.२५१ वेळ नोंदवली. वैयक्तिक एक किलोमीटर टाइम ट्रायल प्रकारातही आकांक्षाने पहिल्याच प्रयत्नात १ मिनिट १८.०१ सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. या दमदार कामगिरीच्या जोरावर मेघालय येथे होणाऱ्या ३९ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे. दरम्यान, १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी आकांक्षा सध्या बालेवाडी येथे सराव करत आहे. –

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

Pune Water Scarcity : तर पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट येईल - प्रशांत जगताप

SCROLL FOR NEXT