नाशिक

विखरण माध्यमिक विद्यालयात आकाश कंदील स्पर्धा

CD
विखरण विद्यालयात आकाश कंदील स्पर्धा म्हसदी, ता. ८ : येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात दीपावली सणाच्या उत्सवानिमित्त आकाश कंदील निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सातवी अ गट, तर आठवी ते दहावी ब गटात स्पर्धा घेण्यात आली. खोंडामळीच्या केंद्रप्रमुख निकिता जाधव, माजी प्रभारी केंद्रप्रमुख आनंदराव करणकाळ, मुख्याध्यापक दासू गांगुर्डे, बापू ठाकरे, उपशिक्षक एम. डी. नेरकर, वाय. डी. बागूल, डॉ. आर. आर. बागूल यांच्या परीक्षणातून ‘अ’ गटातून प्रथम सोहम ठाकूर, द्वितीय आरोही मराठे, तृतीय चैताली पाटील, दीक्षा पाटीलने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. तसेच, ‘ब’ गटातून प्रथम मानसी पाटील, द्वितीय तुषार पाटील, तृतीय दिव्या ठाकरे, तर सलोनी भील उत्तेजनार्थ बक्षीसाची मानकरी ठरली. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. उपशिक्षक सी. व्ही. नांद्रे, एस. एच. गायकवाड, डी. बी. भारती, एम. एस. मराठे, ए. एस. बेडसे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जे. एस. पाटील, एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

SCROLL FOR NEXT