Marathi Natya Parishad  sakal media
नाशिक

नाशिक : नाट्य परिषदेच्या रंगभूमी पुरस्कारांची घोषणा

राजेंद्र तिडके यांना पहिला रंगकर्मी कार्यकर्ता पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Marathi natya parishad) नाशिक (nashik) शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या रंगभूमीदिन पुरस्कार, (स्व) शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कारांची घोषणा रंगभूमी दिनाचे (Marathi rangbhumi din) औचित्य साधून शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम (ravindra kadam) यांनी केली. रंगभूमीदिन पुरस्काराचे (rangbhumi award) दहा, तर विशेष योगदान पुरस्काराचे चार मानकरी आहेत.

डिसेंबरमध्ये नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर रंगभूमीदिन पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीत रवींद्र कदम, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश भुसारे, राजेश जाधव, रवींद्र ढवळे यांचा समावेश होता. यंदा प्रथमच रंगकर्मी कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार असून, यासाठी राजेंद्र तिडके यांचे नाव जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेला राजेश भुसारे, राजेश जाधव, विनोद राठोड आदी उपस्थित होते.

विशेष योगदान पुरस्कार

(स्व.) शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कार नारायण चुंभळे, निवृत्ती चाफळकर, संजय गीते, नितीन वारे यांना देण्यात येणार आहे.

असे आहेत पुरस्कार

पुरस्कारांची नावे पुरस्कारार्थी

(स्व.) दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरूष) दीपक करंजीकर

(स्व.) शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री) विद्या करंजीकर

(स्व.) प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन) प्रदीप पाटील

(स्व.) नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार (लेखन) दत्ता पाटील

(स्व.) पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी) सुरेश गायधनी

(स्व.) जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) धनंजय वाखारे

(स्व.) गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना) विनोद राठोड

(स्व.) रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत) जितेंद्र देवरे

(स्व.) शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (शाहीर पुरस्कार) राजेंद्र जव्हेरी

(स्व.) विजय तिडके स्मृती पुरस्कार (रंगकर्मी कार्यकर्ता) राजेंद्र तिडके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT