‘अक्षरबंध’ प्रतिष्ठानचे
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : अक्षरबंध प्रतिष्ठानतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०२४-२५ राज्यस्तरीय ‘अक्षरबंध'' साहित्य पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी शुक्रवारी केली. या पुरस्कारांसाठी राज्यभरातून आणि राज्याबाहेरील साहित्यिकांकडून तीनशे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
सप्तर्षी माळी, प्रवीण जोंधळे, साई बागडे, नीलेश भोगे यांनी पुरस्कार निवड समितीवर काम केले. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये तीन हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने अक्षरबंध परिवाराने राज्यस्तरीय ‘अक्षरबंध'' साहित्य पुरस्कार सुरू केले आहे. या पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे लवकरच करण्यात येणार असून अक्षरबंध साहित्य पुरस्कारांसाठी तुकाराम ढिकले, प्रशांत कापसे, प्रकाश कोल्हे, सतीश कापडणीस, प्रभाकर चौधरी, दीपाली मोगल-बोंबले, कपिल भालके यांनी पुरस्कृत केले. त्याचबरोबर प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय ‘अक्षरबंध साहित्यरत्न'' आणि ‘अक्षरबंध जीवनगौरव'' पुरस्काराची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
-------------
पुरस्काराचे मानकरी असे
-डॉ. सुनीता चव्हाण, मुंबई (कथासंग्रह : इच्छामरण)
-सागर जाधव, चांदवड (काव्यसंग्रह : माती मागतेय पेनकिलर)
-मनोज कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर (कादंबरी : चिगूर)
-डॉ. श्रीकांत पाटील, घुणकी, कोल्हापूर (बालसाहित्य : सागरलाटा)
-संतोष शिंदे, वडगाव, पुणे (आत्मकथन : पटयारा)
-डॉ. नरेंद्र पाठक, ठाणे (ललित : वानोळा)
-डॉ. शिवाजी शिंदे, सोलापूर (समीक्षा : निवडक स्त्री आत्मकथने)
-विद्या अंबिके, पुणे (अनुवाद : भाषा देहबोलीची)
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.