Suicide attempt esakal
नाशिक

मद्यपी प्रेमवीराचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

नरेश हाळणोर

नाशिक : प्रेमभंग व नैराश्यातुन युवकाने सरकारवाडा पाेलिस ठाण्यात विषारी आैषध सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. (Alcoholic lover attempts suicide at police station Nashik Crime News)

राजेश रामसेवक भारती (२८ रा. गवळी चाळ, गंगासागर कॉलनी, गंगापूररोड) असे या युवकाचे नाव आहे. पाेलिसांच्या माहितीनुसार, या युवकाचा विवाह दाेनदा ठरूनही त्यास नकार मिळत हाेता. तसेच मद्याच्या व्यसनामुळे मुली त्याच्या समवेत लग्न करण्यास नकार देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. आप्तस्वकीयांसह नातेवाईकांच्या मध्यस्थीतून विवाह ठरला जातो. मात्र राजेश वधूच्या भेटीपूर्वीच मद्याच्या नशेत मुलीशी मोबाईलवर संपर्क करीत असल्याने त्यास दोन मुलींनी नकार दिल्याचे समाेर आले आहे.

दरम्यान, राजेशने सोमवारी (ता5)दुपारच्या सुमारास सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून मद्याच्या नशेत सरकारवाडा पाेलिस ठाण्याच्या ठाणे अंमलदार कक्षात उभे राहून उंदीर मारण्याचे आैषध सेवन केले. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याविरोधात या सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक निरीक्षक खैरणार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT