All post graduate candidates have been declared eligible for MPSC exam esakal
नाशिक

MPSC Exam : परीक्षेस सर्व पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार पात्र; पदवीधारक उमेदवारांबाबतच्या निर्णयात बदल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस सर्व पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे. पदवीधारक उमेदवारांनासंधी देण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. (All post graduate candidates have been declared eligible for MPSC exam nashik news)

माहिती उपसंचालक, माहिती वरिष्ठ सहाय्यक संचालक, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक माहिती संचालक, अधीपरीक्षक, माहिती अधिकारी या पदांच्या भरतीसाठी ३० डिसेंबर २०२२ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने सरकारच्या १९ एप्रिलच्या पत्रानुसार समतूल्य शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ८ मेपर्यंत देण्यात आली आहे.

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ८ मे ही अंतिम मुदत असेल. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची अंतिम मुदत १० मे राहील. चलनाद्वारे परीक्षा शुल्क ११ मेपर्यंत भरता येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्‍यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT