डांबून ठेवल्याचा आरोप sakal
नाशिक

Nashik : अधिकाऱ्याला डांबून ठेवल्याचा आरोप

स्पष्टीकरण मागवून संबंधितांवर कारवाईच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्याला काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी शुक्रवारी (ता.२९) सभागृहात दिल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागवून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या.

शुक्रवारी (ता. २९) आयटी पार्कच्या विषयावर बोलाविण्यात आलेल्या विशेष महासभेच्या सुरवातीला राष्ट्रवादीचे गटनेते शेलार यांनी गौप्यस्फोट केला. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सध्या सुरू आहे. प्रभागरचना तयार करताना हद्दी बदलण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

एका अधिकाऱ्याला डांबून ठेवल्याची माहिती शेलार यांनी दिली. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी शांत राहण्याची घेतलेली भूमिका संशयास्पद असून प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. महापौर कुलकर्णी यांनी विषय गंभीर असल्याने सखोल चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. या विषयावर मनसेचे अशोक मुर्तडक, सलीम शेख यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. आयुक्त दिल्ली दौऱ्यावरून परतल्यावर चौकशी करण्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. दरम्यान, शेलार यांनी आयटी पार्कच्या विषयाचे समर्थन करताना गावठाण क्लस्टर विकासाचा प्रस्ताव आणण्याची मागणी सभागृहात केली. आयटी पार्कपेक्षा गावठाण विकासाचा विषय संवेदनशिल असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT