नाशिक

विनापरवाना उपोषण करणे भोवले

CD
विनापरवाना उपोषण करणे भोवले अमळनेरच्या आंदोलकावर जळगावात गुन्हा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : पोलिसांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, पूर्वकल्पना न देताच शासकीय कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अमळनेरच्या एका अंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप हरकचंद जैन (रा. सुदीप कॉम्प्लेक्स, न्यू प्लॉट, धुळे रोड, अमळनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकाचे नाव आहे. जिल्‍हापेठ पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहरातील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (मेन गेट) गुरुवारी (ता.१२) दुपारी १२ वाजेपासून दिलीप जैन उपोषणाला बसले होते. त्यांनी या आंदोलनासाठी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. या प्रकारामुळे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन व भंग झाल्याप्रकरणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सचिन सुरेश महाजन (वय २६, रा. वाघ नगर, जळगाव) यांनी तक्रार दिल्यावरुन शुक्रवारी (ता. १३) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अद्याप आंदोलकास अटक करण्यात आलेली नसून, तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT