Shahr-e-Khatib Hisamuddin Khatib was felicitated by Ganeshotsav Mahamandal Committee and all party leaders. esakal
नाशिक

Nashik News: हिंदू- मुस्लिम बांधवांची अमन परिषद; सामाजिक, धार्मिक सलोखा कायम टिकविण्याचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बडी दर्गा परिसरातील मदरशांमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांची अमन परिषद झाली. सामाजिक, धार्मिक सलोखा कायम टिकून राहील, असा संदेश परिषदेत देण्यात आला. आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणूकीबाबत शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले. (Aman Parishad of Hindu Muslim Brothers message of maintaining social and religious harmony Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी दोन्ही एकाच दिवशी येत आहे. ईद मिलादनिमित्त जुने नाशिक परिसरातून जुलूस काढण्यात येतो. तर गणेश विसर्जन निमित्ताने मिरवणुकीही काढण्यात येते.

दोन्हीही मिरवणुकीचे स्वरूप भव्य असल्याने हिंदू- मुस्लिम बांधव आणि पोलिस प्रशासन यांची भंबेरी उडाली होती. जुलूस एक दिवस पुढे ढकलावा, असे प्रयत्न सुरू होते.

शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब तसेच मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत जुलूस एक दिवस उशिरा शुक्रवारी (ता.२९) काढण्याचा निर्णय घेतला.

निर्णयामुळे निमित्ताने बडी दर्गा परिसरातील मदरशांमध्ये अमन परिषद झाली. सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आले.

आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, सुधाकर बडगुजर, हरिभाऊ लोणारे, गणेशोत्सव महामंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, अंकुश पवार यांनी उपस्थिती लावत शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांचे आभार व्यक्त केले.

त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत गणेशोत्सव महामंडळ समिती तसेच सर्व धर्मीय मुस्लिम बांधव नेते यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात नेहमी सामाजिक धार्मिक सलोखा नांदेल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.

अमन परिषदेचा मुख्य हेतू पूर्ण करण्यास कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिषद होताच जोरदार पाऊस झाला. पावसानेदेखील या निर्णयासह अमन परिषदेचे स्वागत केले.

बडी दर्गा येथे प्रार्थना

अमन परिषदेस उपस्थित सर्वपक्षीय नेते, आमदार, हिंदू- मुस्लिम बांधवांनी बडी दर्गा येथे चादर शरीफ अर्पण केली. श्री. खतीब यांनी फातेहा पठण केले. अशाच पद्धतीने यापुढेही धार्मिक सामाजिक सलोखा नांदो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT