नाशिक

पर्यावरण प्रेमींची राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल

CD
अंबड भूगर्भातील घातक रसायनयुक्त पाण्याचा प्रश्न ऐरणीवर पर्यावरणप्रेमींची राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर घातक व विषारी रसायने मिसळलेले पाणी आढळल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी व भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण रोखावे, या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता बेकायदेशीरपणे जमिनीत अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जात असल्यामुळे भूगर्भातील पाणी अत्यंत विषारी झाले असून, बोअरवेलमधून थेट घातक रसायनमिश्रित पाणी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुर्धर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यामुळे अखेर पर्यावरण संरक्षणासाठी लवादाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. या याचिकेद्वारे भूगर्भातील पाण्याचे नमुने तातडीने तपासून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेणे, जबाबदारांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आणि बाधितांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका दत्तू ढगे, प्रवीण शिलावट आणि रोशन केदार यांनी संयुक्तपणे दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT