Crime News
Crime News esakal
नाशिक

Ambad Kardile Case : मुंबईतून फॉरेन्सिकचे तज्ज्ञ पथक पाचारण; तपास काही लागेना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथील बच्चू कर्डिल यांचा शुक्रवारी (ता. २५) रात्री खून झाला होता. याप्रकरणी अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे मिळून आलेले नाहीत. यासाठी मुंबईतून फॉरेन्सिक तज्ज्ञांचे एक पथकाला पाचारण करण्यात येणार आहे. तसेच, या घटनेतील चोरीला गेलेल्या कोठीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विहिरी उपसल्या, ओढे-नाल्यांमध्ये शोध घेतला. परंतु, पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. (Ambad Kardile murder Case Forensic expert team called from Mumbai Nashik crime News psl98)

अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांसह रॉडने वयोवृद्ध बच्चू कर्डिल यांच्या डोक्यावर वार करीत, त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. संशयितांनी घरातून लहान कोठीसह पोबारा केला. याप्रकरणी गेल्या पाच दिवसात शहर पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला आहे. परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागू शकलेले नाहीत. संशयितांनी नेलेली कोठी शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विहिरींचा उपसा केला. ओढे- नाल्यांची तपासणी केली. त्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापरही केला.

मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. परिसरात कोठेही सीसीटीव्ही नसल्याने संशयितांची माहिती मिळत नाही. तांत्रिक विश्‍लेषणानुसार तपास सुरू आहे. सदर घटनेसंदर्भात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तपासाचा आढावाही घेतला. त्यानंतर मुंबईतील फॉरेन्सिक तज्ज्ञांचे एक पथकाला बोलाविण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

त्यामुळे खुनाच्या बारीकसारीक तथ्यातून माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. तर, पळविण्यात आलेल्या कोठीमध्ये कर्डिल यांच्या मालमत्तेची कागदपत्रे असल्याचे सांगितले जाते. त्यावरून सदरचा प्रकार मालमत्तेचा वा जमिनीच्या व्यवहारातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, हे सारे गुन्ह्याची उकल झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

खोली सीलबंद

ज्या ठिकाणी बच्चू कर्डिल यांचा खून झाला, ती खोली पोलिसांनी सीलबंद केलेली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या श्‍वानपथकही घराच्याच आसपासच्या परिसरात घुटमळले होते. स्थानिक फॉरेन्सिकच्या हाती काहीही लागलेले नसल्याने विशेष पथकाकडून पुन्हा फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे. त्यातून पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT