Ambadas Waje was elected unopposed as the state president of the primary teachers union Sakal
नाशिक

नाशिकचे अंबादास वाजे शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदी बिनविरोध

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : प्राथमिक शिक्षकांचे झुंजार नेते, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष, अंबादास वाजे यांची प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवेढा (जि सोलापूर) येथील शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. शिक्षकनेते वाजे यांच्या रूपाने नाशिकला पहिल्यांदाच राज्याध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यासह राज्यात शिक्षक संघाची मजबूत बांधणी करून संघटनेच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिल्याने त्यांना राज्याध्यक्षपदी बढती देण्यात आली. निवडीनंतर शिक्षक संघाचे राज्यनेते संभाजीराव थोरात, मावळते राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक संघाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, ठोंबरे, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून संघटना वाढीसाठी कटिबद्ध राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंत्रालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आदी ठिकाणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने निवेदने देवून सकारात्मक चर्चा घडवून अंबादास वाजे यांच्या निवडीचे नाशिक जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

'खुर्ची'वरून राडा... एक पोस्ट, दोन अधिकारी... CMO कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

Latest Maharashtra News Live Updates: वि. के. वयम् मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT