Officials and drivers felicitating ambulance driver Nitin Jadhav for his honesty  esakal
नाशिक

Nashik News : रुग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा; वाहनात सापडलेले पैसे, मोबाईल केला परत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महामार्गावरील अपघातातील जखमी रुग्णांना जीवदान देण्यासाठी तत्काळ घटनास्थळी पोचत रूग्णालयात दाखल करणाऱ्या शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेचे चालक नितीन जाधव यांनी रुग्णवाहिकेत सापडलेले पैशांचे पाकिट आणि मोबाईल संबंधित यांना परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.(Ambulance driver Nitin Jadhav returned money packets and mobile phones found to concerned person nashik news)

त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सौंदाणे गावाजवळ बांधकाम मजुराला घेऊन जाणाऱ्या ४०७ वाहनाला अपघात झाला. अपघाताची बातमी कळताच महामार्गावरील १०८ रुग्णवाहिकेला सूचना मिळाल्यानंतर नितीन जाधव व डॉ.महेंद्र पाटील यांनी अपघातातील पाच रुग्णांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

तेथून रुग्णवाहिका परतीच्या प्रवासात असताना वाहनचालक नितीन जाधव यांना वाहनामध्ये रुग्णाचे पैसे आणि मोबाईल मिळून आला. यावेळी त्यांनी तत्काळ रुग्णालयाच्या नातेवाईक यांच्याशी संवाद साधून पैसे व त्यांचा मोबाईल परत दिल्याने रुग्णाचा नातेवाइकांनी आभार व्यक्त केले.

श्री. जाधव यांच्या या प्रामाणिकपणासाठी १०८ वाहन चालक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संलग्न कोर कमिटी नाशिक जिल्हाध्यक्ष अभय सोनवणे, जिल्हा समन्वयक अजित उगले, कोर कमिटीचे उत्तम महाराष्ट्र अध्यक्ष निवास घुगे, सल्लागार गोरक्षनाथ चौधरी, नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र खैरनार, मोहन सोनवणे, घनश्याम जाधव, चंद्रशेखर देवरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT