NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: मलनिस्सारण केंद्रांच्या प्रस्तावात सुधारणा

सकाळ वृत्तसेवा

NMC News : आगामी सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरीसह उपनद्या प्रदूषणमुक्त करणे आवश्‍यक आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाला महापालिकेने ५३० कोटींचा प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावाच्या तांत्रिक तपासणीसाठी उत्तराखंड येथील आयआयटी रुरकीच्या पथकाने मलनिस्सारण केंद्रांची पाहणी करून सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानिमित्त मलनिस्सारण केंद्रांच्या सुधारणेला गती मिळाली आहे. (Amendments to Sewerage Centers proposal NMC News Nashik)

केंद्र व राज्य प्रदूषण मंडळाच्या नव्या निकषानुसार मलनिस्सारण केंद्रांतून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त मलजलामधील बायो ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ची पातळी वाढविण्यात आली आहे.

त्यामुळे मलनिस्सारण केंद्रांची क्षमतादेखील वाढविणे महापालिकेला क्रमप्राप्त आहे. केंद्रांच्या क्षमता वाढीसाठी महापालिकेकडे निधी नसल्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास ५३०. ३१ कोटींचा हा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाला सादर केला.

जलशक्ती मंत्रालयाने प्रस्तावाच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी उत्तराखंड येथील रुरकी येथील आयआयटीच्या पथकाला तपासणीच्या सूचना दिल्या.

आयआयटी रूरकीचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. अरुणकुमार व प्रा. राणा यांनी आगर टाकळी, तपोवन, चेहेडी व पंचकच्या केंद्राला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर प्रस्तावात सुधारणा सुचविल्या आहेत.

ड्रेनेज व्यवस्थेची माहिती

शहरात जवळपास दररोज ५३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. वापरात आलेले पाणी मलनिस्सारण केंद्रापर्यंत २७०० किलोमीटर मलवाहिकांच्या माध्यमातून आणण्यासाठी आठ सिव्हरेज झोन आहे.

आगर टाकळी, तपोवन, चेहेडी, पंचक, गंगापूर व पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रांत मलजल येते. येथे केंद्रांत मलजलावर प्रक्रिया होते. पुढे प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडले जाते.

गंगापूर व पिंपळगाव खांब वगळता आगर टाकळी, तपोवन, चेहेडी व पंचक येथील मलनिस्सारण केंद्रे २०१५ पूर्वीचे आहेत. या केंद्रांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये पर्यावरण विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला होता.

राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत जून २०२२ मध्ये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या ड्रेनेज व्यवस्थेची माहितीदेखील सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

"आयआयटी रुरकीच्या पथकाने मलनिस्सारण केंद्रांची पाहणी करून प्रस्तावात सुधारणा सुचविल्या असून, त्याअनुषंगाने कारवाई केली जाणार आहे."

- उदय धर्माधिकारी, अधिक्षक अभियंता, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT