नाशिक

अमित शहांकडून भारतीय जैन संघटनेच्या कार्याचे कौतुक

CD
अमित शहांकडून भारतीय जैन संघटनेच्या कार्याचे कौतुक ४० वर्षांच्या सामाजिक योगदानाचा घेतला आढावा; संस्थापक शांतिलाल मुथ्था यांना दिल्ली भेटीचे निमंत्रण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) मुख्यालयाला भेट देऊन संस्थेच्या ४० वर्षांच्या सामाजिक व राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी संस्थापक शांतिलाल मुथ्था यांना सहकाऱ्यांसह व्यापक विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. मुथ्था यांनी संस्थेच्या शिक्षण, जलसंवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसनविषयक उपक्रमांची माहिती दिली. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र व गोव्यातील ८७ हजार सरकारी व अनुदानित शाळांमधील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत साडेतीन लाख शिक्षकांच्या माध्यमातून मूल्यशिक्षण पोहोचविले जात आहे. जलसंवर्धन अभियानातून १४ हजार २०४ जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, ११४९ कोटी लिटर जलसाठवण क्षमता वाढली आहे. यावेळी फोर्स मोटर्सचे चेअरमन अभय फिरोदिया, बीजेएसचे ट्रस्टी वल्लभ भन्साळी, अरुण नहार, उद्योगपती जयंत शहा, सरला मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला आणि व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन उपस्थित होते. संस्थेच्या कार्याला मिळालेले प्रोत्साहन अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया साखला यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT