Amit Shah nashik visit canceled Nityananda Rai visit to nashik sakal
नाशिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक दौरा रद्द!

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक जिल्हा दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे आहे. अमित शहा यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे जिल्हा दौर्‍यावर येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून त्रंबकेश्वर येथील मंदिर परिसरात आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात येत होती.

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून त्यांच्या सुरक्षिततेचा संपूर्ण आढावा देखील घेतला जात होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देत अधिकारी व प्रशासन यांना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. मात्र रविवार (ता.१९) सायंकाळी उशिरा अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. अमित शहा ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय जिल्हा दौऱ्यावर येऊन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम

ना काँग्रेस, ना भाजप! 2 अपवाद सोडले तर महाराष्ट्रात पोटनिवडणूक बिनविरोधची परंपराच नाही!

School Verification Kolhapur : परीक्षेच्या काळात होणार शाळांची पटपडताळणी, शिक्षकांची उडणार तारांबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात भयंकर प्रकार! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Satara Accident: सुळेवाडीत पादचाऱ्याचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू; मल्हारपेठ पोलिसांत दुचाकीस्वारावर गुन्हा!

SCROLL FOR NEXT