धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 35337
--
तणावमुक्तीसह आनंदी बालपणासाठी अमृत वर्ग
-
विनामूल्य उपक्रमात शाळा, गृहनिर्माण सोसायट्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : बदलत्या जीवनशैलीत अभ्यासाचा वाढता ताण, स्पर्धात्मक वातावरण, मोबाईलचा अतिवापर आणि मैदानी खेळांचा अभाव यामुळे मुलांच्या मानसिक व भावनिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. मुलांमधील हा ताण कमी करून त्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेमार्फत अमृत वर्ग हा विशेष बालस्नेही उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या परिसरात असे वर्ग सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ‘अमृत’चे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी केले आहे.
-
केवळ शालेय शिक्षणाऐवजी मुलांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्यात सकारात्मक सवयी, संघभावना व शिस्त रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या वर्गांतर्गत वॉर्मअप, व्यायाम, पारंपरिक मैदानी खेळ, बैठे खेळ, गाणी आणि गोष्टी सांगणे अशा मनोरंजक कृती घेतल्या जातील. यातून मुलांची शारीरिक लवचिकता, स्मरणशक्ती आणि सार्वजनिक ठिकाणी धीटपणे बोलण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. तसेच संवैधानिक मूल्ये, राष्ट्रीय कर्तव्ये, तणाव व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबतही मुलांना मार्गदर्शन मिळणार आहे.
-
जागा, वेळ द्यावा
हा उपक्रम विनामूल्य असून, शाळा व गृहनिर्माण सोसायट्यांनी केवळ आवश्यक जागा आणि वेळ उपलब्ध करून द्यायचा आहे. अमृत संस्थेमार्फत प्रशिक्षित केलेल्या संबंधित शाळा किंवा सोसायटीतीलच युवक-युवतींमार्फत हे वर्ग घेतले जातील. आवश्यकतेनुसार वर्ग घेणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोयही संस्था करणार आहे. पालक, शिक्षक आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या भावनिक विकासासाठी या उपक्रमाला परवानगी देऊन प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी इच्छुकांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक (९११२२२८७७२) यांच्याशी संपर्क साधावा.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.