amrut scheme esakal
नाशिक

Amrut Yojana: 23 कोटींची ‘अमृत’ योजना मंजूर! सिन्नरच्या कानडी मळा, लिंगटांगवाडीसह उपनगरांचा पाणीप्रश्‍न सुटणार

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : केंद्रशासन पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत सिन्नर नगरपालिकेच्या वाढीव हद्दीसाठी २३.६६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.

माजी नगरसेविका शीतल कानडी यांच्यासह तत्कालीन नगरसेवकांनी यासंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी लावून धरली होती.

आमदार कोकाटे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली. त्यामुळे कानडी मळा, लिंगटांगवाडीसह उपनगरांची पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे. (Amrut Yojana 23 crore Amrut scheme approved Kandi Mala Lingtangwadi and suburbs of Sinnar will get rid of water problem nashik)

सिन्नर शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून कडवा धरण जलस्त्रोत असलेली ७२ कोटींची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेद्वारे शहर परिसरातील पाणीप्रश्न बऱ्याच अंशी सुटला, तरी वाढीव हद्दीतील काही उपनगरांचा पाणीप्रश्न मात्र कायम होता.

विशेषतः बारागावपिंप्री रस्त्यालगत नव्याने वसलेल्या नगरांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. परिणामी, काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माजी नगरसेविका शीतल कानडी यांनी आमदार कोकाटे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

आमदार कोकाटे यांनी केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेंतर्गत वाढीव हद्दीसाठी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला केल्या.

प्रस्ताव सादर केल्यानंतर नगरविकास विभागाकडे आमदार कोकाटे यांनी पाठपुरावा केला. त्यास यश आले असून, वाढीव हद्दीसाठी २३.६६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे.

केंद्र व राज्य शासनाचा ९० टक्के हिस्सा पाणीपुरवठा प्रकल्पास मंजूर झालेल्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के हिस्सा केंद्र शासनाचा, ४० टक्के राज्य शासनाचा, तर 10१० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेला भरावी लागणार आहे.

मंजूर झालेल्या प्रकल्पाचे ४५ दिवसांच्या आत कामाचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. याशिवाय अमृत अभियानाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार २०, ४०, ४०, अशा तीन टप्प्यांत केंद्र आणि राज्य हा निधी नगरपालिकेला वितरित करणार आहे.

ही उपनगरे होणार टँकरमुक्त

कानडी मळा, उकाडे मळा, कुटे मळा, वाळुंज मळा, हुसेनबाबा वस्ती, लिंगटांगवाडी, काळे वस्ती, गवळी मळा आणि परिसरातील नवीन वसाहतींना पाणीपुरवठा योजना नसल्याने नगरपालिकेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

या सर्वच वस्त्या आणि उपनगरांना अमृत २ योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, हा भाग टँकरमुक्त होणार आहे.

दोन जलकुंभ उभारणार

लोणारवाडी येथून मुख्य जलवाहिनीला जोडणी करून बंधन लॉन्सजवळ ११.६० लाख लिटर आणि कानडी मळ्याजवळ असलेल्या कुटे वस्तीजवळ ४.३० लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारले जाणार आहेत.

याशिवाय ६१.२५ किलोमीटर एचडीपी आणि डीआय वितरिका टाकण्यात येणार आहे. शिवाय एनस्प्रेस फिडरही बसविण्यात येणार आहे. कुटे वस्ती येथे सम्प बांधून १५ अश्वशक्तींचे दोन वीजपंप टाकून पाणी उचलले जाणार आहे. स्काडा सिस्टीमही कार्यान्वित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT