Nashik crime News  esakal
नाशिक

Crime : क्राईम ब्रांच असल्याचे बतावणी करून वृद्धास लूटले

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : पांढुर्ली शिवारात क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगत एकाला लुटल्याची घटना घडली. आम्हाला तुमची तपासणी करायची असल्याचे सांगून वृद्धास लुटल्याची घटना पांढुर्ली शिवारात घडली. (Robbed an old man by fake crime branch officer Nashik News)

लक्ष्मण आवडजी भोर (वय ५२, रा. विंचूर दळवी) हे दुचाकीवरून नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी पांढुर्ली येथील लक्ष्मण महाराज आश्रमाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडने जात होते. त्या वेळी सफेद रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, चॉकलेटी रंगाचे बूट घातलेला मध्यम वयाचा एक व्यक्ती विनानंबरच्या पल्सर दुचाकीवरून आला. त्यांनी भोर यांना थांबवत, आम्ही क्राइम ब्रँचमधून आल्याची बतावणी करून आम्हाला तुमची तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्या वेळी त्याने भोर यांच्या खिशातील २० हजारांची रोकड व दोन तोळ्यांची सोन्याची चैन काढून घेत रुमालात बांधून फिर्यादीस परत करत तेथून निघून गेला.

श्री. भोर यांनी रुमाल उघडला असता त्यात काहीही नसल्याचे दिसून आले. भामट्याने हातचालकीने त्यांची रोकड व चैन घेऊन तेथून पसार झाला. श्री. भोर यांना आपण लुटले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात भामट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय माळी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT