Anand Bangar with his crew
Anand Bangar with his crew esakal
नाशिक

Achievement : दार्जिलिंगमधील खडतर गिर्यारोहण प्रशिक्षण आनंद बांगरने केले पूर्ण

आनंद बोरा

नाशिक : दार्जिलिंग येथील हिमालयीन पर्वतारोहण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून चिचोंडी (भंडारदरा) पाड्यावरील आनंदा बांगर याने प्रशिक्षण पूर्ण केले. आनंदसमवेत महाराष्ट्रातील वैष्णवी चौधरी, मुंबईचा प्रणीत शेळके, नाशिकची वैशाली चौधरी, अकोलेचा योगेश काळे, पुण्याचा तुषार दिघे आणि शंकर मरागळे यांचा प्रशिक्षणार्थीमध्ये समावेश होता. (Anand Bangar first boy from bhandardara completed tough climbing training in Darjeeling nashik News)

आनंदा अनेक वर्षांपासून कळसूबाई रांगेतील गड -किल्ल्यावर पर्यटकांना मार्गदर्शनाचे काम करत आहे. कळसूबाई-हरिश्चंद्र गड परिसर म्हटला की गडकिल्ले-उंच डोंगर, कातळ कडे, घाटवाटा डोळ्यापुढे उभा राहतात. पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या दृष्टीने गिर्यारोहण प्रशिक्षण स्वतः पूर्ण करणे आवश्यक आहे.

त्यासाठी आनंदाने हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. गेल्यावर्षी अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण संस्था येथून बेसिक कोर्स पूर्ण करून ए-ग्रेड प्रमाणपत्र मिळवले होते. त्याची दार्जिलिंगच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षणात जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाची कसोटी लागते. शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक आहे.

गिर्यारोहण साहित्याची ओळख करून देत असताना गाठी बांधणे, कातळ आरोहण-अवरोहण, व्हॅली क्रॉसिंग, नदी क्रॉसिंग, शोध आणि बचाव, आपत्कालीन परिस्थितीत पूर-भूकंप-आग यामध्ये स्वतःची काळजी घेत इतरांना वाचविण्याचे कौशल्य प्रशिक्षणात शिकवले जाते. इथे दररोज भल्या पहाटे उठून ट्रेक चालू करावा लागतो. कडक शिस्तीचे पालन करावे लागते. बर्फावरील प्रशिक्षणामध्ये आईस क्लाइंबिंग, ग्लेशियर फिक्स रोप असे प्रशिक्षण दिले जाते.

काब्रू डोम कॅम्प या १७ हजार ५०० फूट उंचावरील ठिकाणी आनंदा आणि त्याच्या टीमने तिरंगा ध्वज फडकावला. प्रशिक्षणासाठी आनंदाला सह्याद्रीमधील भटकंती उपयोगी पडली. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्टवीर रफीक शेख, मनीषा वाघमारे यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. आनंदा हा मातोश्री वेळबाई देवाजी हरिया महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

"प्रशिक्षण केंद्रात देशातून १५ ते ४५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी होतात. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरामध्ये साहसी पर्यटन करणाऱ्या तरुणांनी हे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. या भागातील मुलांना गिर्यारोहण विषयक माहिती देऊन साहसी पर्यटन विकास करणे, क्रीडा गिर्यारोहणामध्ये चांगली कामगिरी करणे या प्रशिक्षणाचा उद्देश आहे."

- आनंदा बांगर, गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT