Antapur-Dasvel road is in bad condition esakal
नाशिक

Nashik : अंतापूर रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

ताहाराबाद (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील अंतापूर-दसवेल रस्त्यावरील अंतापूर गावाजवळून जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनधारक व दावल मलिकबाबा यांच्या मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांची मोठी अडचण निर्माण होत असल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (Anantapur road in bad condition demand for repair Nashik Latest marathi news)

अंतापूर येथील दावल मलिकबाबा देवस्थान येथे दर गुरुवारी मोठा यात्रोत्सव साजरा होतो. यानिमित्त हजारो भाविक येथे हजेरी लावतात. मात्र अंतापूर गावातून दसवेलकडे जाणारा रस्ता दावल मलिकबाबा देवस्थानकडे जाण्यासाठी वापरला जातो.

या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गटारी नसल्याने रस्त्यावर नेहमी सांडपाणी वाहते. परिणामी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालविणे जिकिरीचे होतेच पण यात्रेकरू व ग्रामस्थ यांनाही पायी चालणे अवघड बनते. रस्त्याच्या समस्येमुळे ग्रामस्थ, यात्रेकरू वैतागले आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मोसम नदीवर असलेल्या पुलाची गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात मोठी पडझड झाली होती. मात्र यंदा नदीला आलेल्या पुरामुळे पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यात्रेकरूंची वाढती संख्या बघता या ठिकाणी पुलाची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

"महाराष्ट्रात प्रख्यात असलेले दावल मलिकबाबा यांचे देवस्थानावर प्रत्येक गुरुवारी हजारो भाविक येऊन नतमस्तक होतात. येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे संबंधित रस्त्याची व पुलाची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे बनले आहे. " -सचिन कोठावदे, जिल्हाध्यक्ष- नाशिक जिल्हा काँग्रेस (ओबीसी विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT