Ananya stands 4 th in state in state level general knowledge examination nashik news esakal
नाशिक

Nashik News : सामान्य ज्ञान परीक्षेत पहिलीत शिकणारी अनन्या राज्यात चौथी

प्रकाश शेळके

Nashik News : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणारी अनन्या अरविंद सगभोर हिने मंथन वेलफेअर फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२३ यात राज्यात चौथा तर नाशिक जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. (Ananya stands 4 th in state in state level general knowledge examination nashik news)

नंदनवन कार्यालय अहमदनगर येथे झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अनन्याचा शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकार, सिनेअभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

घरातील शैक्षणिक वातावरणात आई - वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे तिची सामान्य ज्ञानाची तयारी होण्यास मदत झाली. वर्ग शिक्षक सुधीर दिघे व संदीप चव्हाण यांनी कौशल्य पूर्ण अध्यापन करत अतिशय मेहनत घेतली. सरावासाठी अनेक सराव चाचण्या घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भालेराव तसेच शाळेतील इतर शिक्षक निर्मला पगार, नंदा मरकड, संदीप पावडे, शिवाजी खेमनार आणि सुनीता बोडके यांचेही मार्गदर्शन लाभले. शाळेतले सर्व शिक्षक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि पालक यांनी अनन्याचे कौतुक करत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT