Venerables performing pooja on the occasion of Shrimhasoba Maharaj Yatra.  esakal
नाशिक

Mhasoba Maharaj Yatra : अतिप्राचीन म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उंटवाडी येथील अतिप्राचीन श्रीम्हसोबा महाराज दोनदिवसीय यात्रोत्सवाला शनिवारी (ता. २९) सुरवात झाली. रविवारी (ता. ३०) सायंकाळी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात्रेनिमित्त रहाट पाळणे, खेळणी तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल लागले आहेत. (ancient Yatra festival of Mhasoba Maharaj begins today nashik news

सिटी सेंटर मॉल नजीक असलेल्या सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीच्या महाकाय वटवृक्षाच्या छायेखाली श्री म्हसोबा महाराजांचे अतिप्राचीन मंदिर आहे. म्हसोबा महाराजांची यात्रा ही उंटवाडीतील ग्रामस्थांमधील सुमारे सहावी ते सातव्या पिढीपासून सुरू आहे आणि हीच परंपरा कायम चालूच आहे.

अतिप्राचीन आणि नवसाला पावणाऱ्या श्री म्हसोबा महाराज यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी पहाटे श्री म्हसोबा महाराजांना शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता यात्रा कमिटीच्या पंचाच्या हस्ते श्रींची महापूजा, महाभिषेक, आरती व तळी भरण्यात आली. रविवारी श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून सांयकाळी ४ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या कुस्त्या मॅटवर होणार असून या कुस्तीच्या फडामध्ये अंबड, सातपूर, पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर, भगूर नाशिक रोड आदींसह विविध भागातील नामवंत पहिलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. महिला पहिलवानांच्या सुद्धा कुस्त्या होणार आहे. या वेळी आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या.

यात्रोत्सवात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर तिडके, दिनकर तिडके, सदाशिव नाईक, रामचंद्र तिडके, अंबादास जगताप, विलास जगताप, विठ्ठल तिडके, बाजीराव तिडके, माजी नगरसेवक दत्ता पाटील, विष्णू जगताप, विष्णू तिडके, संतोष कोठावळे, अशोक तिडके, सतीष कोठावळे, सुनील जगताप, कैलास जगताप, विलास तिडके, पंढरीनाथ जगताप, बाळासाहेब तिडके,

संदीप जगताप, तुषार जगताप, विजय नाईक, ललित तिडके, माजी नगरसेवक अण्णा पाटील, फकिरराव तिडके, राजेश गाढवे, जगन्नाथ तिडके, एकनाथ तिडके, प्रकाश तिडके, सुरेश जगताप, सुरेश तिडके, दत्तात्रेय तिडके, मनोहर तिडके, अॅड. संदीप फडतरे, प्रवीण जगताप, पंकज जगताप, दीपक जगताप, रमेश सूर्यवंशी, रमेश तिडके, श्यामराव जगताप, डॉ. अमोल दिनकर तिडके आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT