सूचना : फक्त जळगाव
शहर टुडे पान चारसाठीच
------------
‘आंध्रा’तील ३ दरोडेखोर
मुक्ताईनगर येथे जेरबंद
--
दोघे फरारी; कारवाईत गावठी पिस्तुलासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. आंध्र प्रदेशातील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जीवंत काडतूस, १० बनावट नंबर प्लेट्स व वाहनांसह एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, त्यांचे दोन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात बुधवारी (ता.१४) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच अनोळखी इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने तात्काळ एस. एस. कॉलेज परिसरात धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना जागीच पकडले, तर दोघे दुचाकी घटनास्थळीच सोडून पसार झाले. मेकला प्रसन्नाकुमार मेकला दास (रा. करपल्ला थिपा, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश), धरसिंगी देरध घोडीडी उर्फ प्रसिंग प्रसाद गुटेड्डी (रा. बिटरगुंडा, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश) व मेकल विरास्वामी कोंडाया (रा. बिटरगुंडा, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश) अशी अटेकेतील संशयितांची नावे आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल
संशयितांकडून २७ हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची पिस्तुल व एक जीवंत काडतूस, ४५ हजार रुपयांचे तीन अँड्रॉइड मोबाईल, १ लाख ७० हजारांच्या दोन दुचाकी, ५,३०० रुपयांची रोख रक्कम, १०५ लोखंडी छरे, स्क्रू ड्रायव्हर, टोप्या, टी-आकाराचे टोकदार हत्यार व विविध गाड्यांच्या १० नंबर प्लेट्स असा एकूण २,४७,३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, हवालदार कल्पेश आमोदकर, असिम तडवी, अंमलदार रवींद्र धनगर, मुकेश महाजन, रितेश चव्हाण व गोविंदा पवार यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.