नाशिक

अंजनेरीत महानुभाव पंथीय मेळावा ; संत-महंत वासनिक भेट सोहळा

CD
पान-३ ३६-३ अंजनेरीत महानुभाव पंथीयांचा मेळावा ---------- संत-महंत वासनिक भेट सोहळा, तिर्थस्थानांना विडा अवसर ---------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२६ : श्रीक्षेत्र अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील श्रीचक्रधर स्वामी मंदिर परिसरात सोमवारी (ता.२६) महानुभाव पंथाचा विशेष मेळावा, ‘स्थान, प्रसाद, वंदन, संत-महंत वासनिक भेट’, तसेच देवपूजा वंदन, विडा अवसर आणि पंचावतार उपहार विधी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात झाला. आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात सकाळपासूनच संत- महंत आणि वासनिक भाविकांनी हजेरी लावली होती. यानिमित्त उपस्थित भाविकांना ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, गंगापूर आणि नाशिक येथील गोदावरी काठावरील पवित्र स्थानांच्या वंदनाचा लाभ मिळाला. जिल्ह्यातील सर्व महानुभाव पंथीय तीर्थस्थानांना उटी व विडा अवसर व वस्त्र समर्पण करण्यात आले. प्रातःकालीन विधी, सकाळी सहाला जिल्ह्यातील सर्व वंदनीय स्थानांना उटी व विडा अवसर अर्पण करून सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अंजनेरी येथे श्रीभगवद्गीता पाठाचे पारायण करण्यात आले. सकाळी सव्वानऊला महंत नागराजबाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महंत गोविंदराज बाबा यांनी ध्वजगीत सादर केले. त्यानंतर देवपूजा, स्थानवंदन आणि वैयक्तिक विडा अवसर विधी पार पडला. सकाळी १० ते ११:३० वा. सभा मंडपाचे उद्घाटन महंत विद्वांस बाबा (फलटण ) यांच्या हस्ते करण्यात आले. श्री चक्रधर सेवा मंडळ, अंजनेरी यांच्यातर्फे उपस्थित संत-महंतांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. महंतांनी उपस्थित साधकांना मोलाचे प्रबोधन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी महंत खामणीकर बाबा उपस्थित होते. महंत नागराजबाबा शास्त्री, महंत कानळस्कर बाबा (बक्तपूर), महंत विद्वांसबाबा शास्त्री (फलटण), भागवताचार्य चिरडे बाबा (निफाड), नाशिकचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महंत खामणीकर बाबा यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि महानुभाव पंथाचे कार्य याविषयी विवेचन केले. व्यासपीठावर महानुभाव परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाश नन्नावरे, जिल्हाध्यक्ष महंत दत्तराज पालीमकर, महंत चक्रपाणीबाबा कोठी, महंत मुरारीमल्ल बास आदी उपस्थित होते. ---------------------

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

GIFT City Investment: ‘गिफ्ट सिटी’ : गुंतवणुकीचा नवा मार्ग

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT