Anjaneya Ayurved College esakal
नाशिक

Nashik News: अंजनेय महाविद्यालयाला BAMS पदवी अभ्यासक्रमासाठी परवानगी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था संचालित अंजनेय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळाली आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली.

आणखी एका मान्यतेने या संस्थेचे आयुर्वेदाचे शिक्षण देणारे दुसरे महाविद्यालय होईल. (Anjaney College approved for BAMS degree course Nashik News)

मखमलाबाद येथे महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली असून, या आयुर्वेद महाविद्यालयामुळे मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसारा, चांदशी अशा बिकट व दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णसेवेचा उपयोग घेता येणे शक्य होणार आहे.

महाविद्यालयात या कोर्ससाठी ९० विद्यार्थिसंख्येला ही मान्यता आयुष मंत्रालयातर्फे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण घेण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे.

महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या या मान्यता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर यांच्‍या प्रेरणेचे फल आहे व येत्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रुग्णालयीन सेवे करण्याची संधी यामार्फत मिळेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वैभव फरताळे यांनी केले.

संस्थेचे हिरावाडी सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या महाविद्यालयामुळे आयुर्वेद शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.

आयुर्वेदाचे वैद्यकीय शिक्षण देण्याबरोबरच रुग्णालयदेखील आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात.

"श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था संचालित अंजनेय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळाल्याने विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे."

- हिमगौरी आहेर-आडके, अध्यक्षा, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT