नाशिक

झाडू हाती घेत राजापूरच्या प्राथमिक शिक्षकाचा स्वच्छतेचा वसा प्रकाश हरणे यांची अंकाई किल्ला,येवला क्रीडा संकुल परिसराचा मोहीम

CD
फोटो-YEO26B27047 येवला : अनकाई किल्ला व कार्यालयाच्या परिसरात कचरा उचलून नेताना शिक्षक प्रकाश हरणे. ------------------ ३०-२ राजापूरच्या शिक्षकाने घेतला स्वच्छतेचा वसा अंकाई किल्ला परिसरात मोहीम -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ९ : स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी भाषणे आणि जनजागृतीचे उपक्रम अनेक ठिकाणी होत असले, तरी स्वतः झाडू हाती घेत परिसर स्वच्छ करण्याचा आदर्श राजापूर जिल्हा परिषद शाळा (नाईक वस्ती) येथील शिक्षक प्रकाश हरणे यांनी घालून दिला आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता शनिवार-रविवारी त्यांनी अंकाई किल्ला व क्रीडासंकुल येथील परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. नोकरीसाठी चंद्रपूरहून येवल्यात आलेले हरणे स्वयंस्फूर्तीने या स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होतात. परिसरात विखुरलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर टाकाऊ साहित्य स्वतः गोळा करत हरणे यांनी परिसर स्वच्छ केला. केवळ झाडू मारून थांबण्याऐवजी जमा झालेल्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यावरही त्यांनी भर दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचत आहे. तरुणांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘भाषणांपेक्षा कृती माणसाला अधिक बदलते. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली, तर स्वच्छ परिसर निर्माण होण्यास वेळ लागणार नाही,’ असा संदेश हरणे यांनी दिला. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT