नाशिक

एएनएम, जीएनएम नर्सिंगच्‍या नोंदणीची आज अंतिम मुदत

CD
एएनएम, जीएनएम नर्सिंगच्‍या नोंदणीची आज अंतिम मुदत ---------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२७ ः वैद्यकीय शिक्षणांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळांतर्गत ‘एएनएम’ व ‘जीएनएम’ नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहापर्यंत पात्रताधारक विद्यार्थी नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. ------------ एएनएम व जीएनएम परिचर्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बारावीच्या गुणांच्या आधारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविण्यास मान्यता दिली आहे. यासाठी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस २१ सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या उद्देशाने नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. बुधवारी (ता.२८) सायंकाळी सहापर्यंत ही मुदत लागू राहिल. शुल्‍कासाठी गुरुवारी (ता.२९) पर्यंत संधी असेल. याच दिवशी विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्राच्या रंगीत स्कॅन प्रती पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दावा केलेल्या प्रवर्गातून प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. सर्व प्रमाणपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करणे अनिवार्य आहे, असेही सीईटी सेलने कळविले आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT