esakal
esakal
नाशिक

Nashik Crime News : डेव्हीड गँगचा आणखी एक संशयित जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सामाजिक कार्यकर्ता विशाल ठवळे याच्या खुन प्रकरणात शहरातील कुख्यात डेव्हीड गँगच्या आणखी एका संशयितास पकडण्यात इगतपूरी पोलिसांना यश आले आहे. पप्या पठारे उर्फ कृष्णा किशोर पेठारे असे या संशयिताचे नाव आहे. (Another David Gang suspect is arrested in vishal thavale murder case nashik crime news)

शहरातील रेल्वे तलाव येथे अंघोळीसाठी गेलेल्या विशाल चंद्रकांत ठवळे (वय ३६, रा. डाकबगंला, इगतपुरी) या विवाहित तरुणावर गेल्यावर्षी २२ मे २०२२ ला दुपारी तीनच्या सुमारास संशयितांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला होता.

धारदार शस्त्राद्वारे विशालच्या मानेची नस कापुन पुन्हा वार करणार तोच विशालने जोरदार कींकाळी मारल्याने संशयित पळून गेले होते. त्यावेळी मदतीसाठी धावा करणाऱ्या विशालचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यु झाला होता. तेव्हापासून फरारी गुन्हेगारांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर ऊभे ठाकले होते. तसेच, या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत शहरातील कुख्यात डेव्हीड गँगमधील जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा (वय २२), अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या (वय २७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी),

अजय राजू पवार उर्फ अजय टाकल्या (वय २३) व पप्या पठारे उर्फ कृष्णा किशोर पेठारे (वय २२, रा. साठेनगर, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. या कुख्यात गुन्हेगारांना अटक केल्यामुळे शहरातील दहशत काही अंशी कमी झाली असुन, शहरवासियांनी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT