Dr. Vaishali Jhankar
Dr. Vaishali Jhankar Sakal
नाशिक

नाशिक : झेडपीच्या शिक्षणाधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

कुणाल संत

नाशिक : शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून स्वीकारल्याच्या कारणातून नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील महिला अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत मोठी चर्चा झाली. झनकर यांच्यासह या प्रकरणात वाहन चालकासह एक प्राथमिक शिक्षक याचा देखील सहभाग आहे.

तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी संस्थेकडे सुमारे ९ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (ता.१०) सायंकाळी साडेपाचला टाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.

त्यानंतर वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्‍वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून सदरची रक्कम स्वीकारली. याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ त्यांच्या थेट झनकर यांच्या दालनात जात त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात वीर यांच्यासह वाहन चालक ज्ञानेश्‍वर येवले, प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (राजेवाडी, ता. नाशिक) यांच्याविरूद्धही कारवाई केली. यानंतर पथक रात्री उशिरापर्यंत पथकाकडून श्रीमती. झनकर यांची चौकशी सुरु होती. संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिराने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित करण्यात आल्यानंतर डॉ. वैशाली झनकर-वीर यांची सर्वप्रथम जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची माध्यमिक शिक्षाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umar Khalid Rejects Bail: उमर खालिद मोठा झटका! कोर्टानं पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

IPL 2024: KKR च्या विजयानंतर रिंकु सिंगचा ऋषभ पंतला Video कॉल, पाहा काय झालं दोघांमध्ये संभाषण

Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

Women Health: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्‍ये एएससीव्‍हीडीचा धोका वाढतो; जाणून घ्या तज्ञांचे मत

Malaika Arora: मलायकाच्या 'त्या' कृत्याचं होतंय कौतुक; व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT