Dr. Sanjay Rathod esakal
नाशिक

Nashik : वैद्यकीय महाविद्यालयातील ‘प्रभारी राज’ ला अखेर विराम; पूर्णवेळ ‘डीन’ ची नियुक्ती

- प्रशांत कोतकर

नाशिक : राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अधिष्ठाता (डीन) पदाचा हा कार्यभार ‘प्रभारी’ च्या आधिपत्याखाली सुरू होता. ‘प्रभारी’ राज केव्हा संपुष्टात येईल व पूर्णवेळ अधिष्ठाता महाविद्यालयांना मिळतील, याची प्रतिक्षा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात होती. ही प्रतीक्षा वर्षभरानंतर का होऊन संपली.

आज राज्यातील पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पत्रान्वये शिफारस केलेले परिविक्षाधीन म्हणून सरळसेवेने अधिष्ठतांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात डॉ. समीर जोशी (लातूर), डॉ. शिल्पा दोमकुंडवार (उस्मानाबाद), डॉ. संजय बिजवे (नागपूर), डॉ. पूर्वा पाटील (अलिबाग), डॉ. संजय राठोड (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. (medical colleges Appointment of full time Dean in 5 medical colleges nashik Latest Marathi News)

माजी विद्यार्थ्याच्या हाती घाटीचा कारभार

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया (घाटी) ला १३ महिन्यानंतर पूर्णवेळ अधिष्ठाता लाभले आहेत. पूर्णवेळ अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर ३० सप्टेंबर २०२१ रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार क्ष- किरण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १३ महिन्यांच्या कालावधीत डॉ. रोटे यांनी यशस्वीरीत्या कामकाज बघत काही महत्वपूर्ण निर्णय घेत रूग्णसेवेवर आपले लक्ष केंद्रित केले होते.

दरम्यान, उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविलयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राठोड हे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन १९८३ चे युजी तर १९९१ च्या बॅचचे पीजी पूर्ण केलेले विद्यार्थी आहेत. त्यांच्या नियुक्तीने घाटी वैद्यकीय महाविद्यालयाला ‘माजी विद्यार्थी’च्या रूपाने पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT