नाशिक

नाशिकरोडची पिवाळ टोळीवर ‘मकोका’ची कारवाई

CD
पिवाल टोळीवर ‘मकोका’ची कारवाई पोलिस आयुक्तांचा दणका : १६ अटकेत, ७ जणांचा शोध सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : नाशिक शहर पोलिसांनी नाशिकरोड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारी चालवणाऱ्या ''अर्जुन सुरेश पिवाल टोळी'' विरुद्ध ''मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीविरोधात फास आवळला आहे. गोसावीवाडी, नाशिकरोड येथील गंगोत्री जनता स्टोअर्ससमोर १६ ऑगस्टला सुमीत अरुण पगारे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुन्ह्याचे नियोजन, प्रत्यक्ष गोळीबार, अग्निशस्त्र पुरवठा, वाहतूक आणि गुन्ह्यानंतरच्या हालचालींचा वेध घेत संशयितांच्या सहभागाचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान पोलिसांनी अर्जुन सुरेश पिवाल टोळीतील आतापर्यंत एकूण १६ संशयितांना अटक केली असून सात संशयितांचा शोध सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने, अग्निशस्त्राशी संबंधित साहित्य, काडतुसे, मोबाईल फोन, सिमकार्ड व इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, सहायक आयुक्त अद्विता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा व नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे. ------------- कोट-- फोटो शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांची किंवा संशयास्पद हालचालींची माहिती न घाबरता पोलिसांना देऊन सहकार्य करावे. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

Latest Marathi News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

SCROLL FOR NEXT