crime against girl
crime against girl esakal
नाशिक

Nashik Crime : युवतींची छेडाछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील रौनकाबाद भागातील शालेय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पवारवाडी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली.

अटक केलेला संशयित मनोरुग्ण असून अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्याची त्याची प्रवृत्ती आहे अशी माहिती पोलिसांना दिली. यामुळे शहर व परिसरातील पालकांनी शहरात मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेवर विश्‍वास ठेवू नये.

आपली मुले, मुली व पाल्यांना सुरक्षित शाळा, महाविद्यालयात पाठवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे. (Arrested for trying to molest young women at malegaon Nashik Crime)

रौनकाबाद भागात दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला दुचाकीवर आलेल्या एका संशयिताचे माझ्या दुचाकीवर बस असे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विचारले. त्यानंतर मुलीला चॉकलेटचे आमिष दाखविले.

मुलीला संशय आल्याने ती नजीकच असलेल्या आपल्या घरी पळून गेली. तिने पालकांना झाला प्रकार कथन केला. या दरम्यान तिचे वडील घराबाहेर येताच संशयित दुचाकीस्वारही फरार झाला. मात्र त्याचे दुचाकीवरील छायाचित्र मिळाले होते.

गुरुवारी (ता. १) रात्री पवारवाडी पोलिस व काही नागरिकांनी शोध घेत खलिल शेख शरीफ (वय ४७, रा. पवारवाडी) याला अटक केली. पवारवाडी पोलिसांनी संशयितास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT