नाशिक

आशा गटप्रवर्तक संघटना निवेदन

CD
धुळे : टुडे पान ३ किंवा ४ साठी... -- फोटो क्रमांक : 35275 दोंडाईचा : गटप्रवर्तकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यालयात प्रतिनिधींकडे देताना राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी. -- गटप्रवर्तकांना शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी -- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनातून वगळल्याने नाराजी -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांचा शासन निर्णयात समावेश करून समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेने केली. याबाबत मुख्यमंत्री तसेच पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. - २००९-१० पासून जिल्हा आरोग्य विभागात गटप्रवर्तक कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. नियुक्तीवेळी त्यांच्याकडून शंभर रुपयांचा बॉण्ड घेण्यात आला होता. मात्र २०१७ नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेचे स्वरूप मानधन तत्त्वावर केले. शासनाने ३० जूनला काढलेल्या निर्णयानुसार १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनास मान्यता दिली, पण त्यातून गटप्रवर्तक पद वगळले. गेली १६ वर्षे आणि कोविड काळातही काम करूनही हा अन्याय झाल्याने २००९-१० पासूनची सेवा ग्राह्य धरून सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील, साहेबराव पाटील यांच्यासह कोकीळा जाधव, नम्रता पाटील, शोभा कोळी, धनश्री सोनवणे, गायत्री ठाकरे, जयश्री शिरसाट, सुवर्णा पाटील, सुशीला माळी, मालूबाई पवार, छायाबाई बैसाणे, प्रतिभा देसले, स्वाती वाघ, अनिता सिसोदे, सरला बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

SCROLL FOR NEXT