NSK26H34511
नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करताना आशा व गटप्रवर्तक.
-----------------
आशा- गटप्रवर्तकांची यंदा काळी दिवाळी
‘जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनावेळी दिला इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कृती आराखड्यातील मोबदला कपात रद्द करतानाच दीपावली भाऊबीज भेट द्यावी, सामाजिक सुरक्षा लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी बुधवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेे. सरकारच्या भूमिकेचा विरोध करताना मागण्यांची पूर्तता न झाल्यास काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
-----------
राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेेने आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या २०२६-२७ च्या मंजूर कृती आराखड्यातील मोबदला कपात रद्द करावी. गटप्रवर्तकांचे समायोजन करताना सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात यावे. पीएफ, ईएसआय व इतर सामाजिक सुरक्षा लाभ तातडीने लागू कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. यासर्व मागण्यांची तात्काळ दखल घेत त्याची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाप्रसंगी आयटकचे राज्य अध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्षा सुरेखा खैरनार, कांचन पवार, संगीता सुरंजे, फराह शेख, ज्योती अहिरे यांच्यासह इतर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या.
---
घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनाप्रसंगी आशा व गटप्रवर्तकांनी जोरदार घोषणा दिल्या. मोबदला कपात करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, गटप्रवर्तकांचे समायोजन झालेच पाहिजे, सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे अशा घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.