The palanquin procession of Saint Shrestha Nivrittinath arrived at Chincholi in Solapur district on Tuesday. Varkari participated in the ceremony. esakal
नाशिक

Ashadhi: भेटीलागी जिवा लागलीसे आस...! करकमच्या रिंगण सोहळ्यानंतर निवृत्तिनाथांची दिंडी आज चिंचोलीत मुक्कामी

ज्ञानेश्वर गुळवे

Ashadhi Wari 2023 : माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी.

पंढरीरायाच्या दर्शनाची आस घेऊन तप्त उन्ह-वारा- पावसाची तमा न बाळगता लाखो वारकरी गेल्या महिनाभरापासून आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर होणाऱ्या सोहळ्यात सामील होण्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा पालखीसह दिंडी सोहळा पंढरपूर वारी पायी मार्गात असताना आज सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली येथे मुक्कामी आहे. (Ashadhi ekadashi 2023 Looking forward to meeting Nivrittinath Dindi will stay in Chincholi today after ring ceremony of Karakam nashik)

करकम येथील रिंगण सोहळ्यानंतर पांढऱ्याच्या वाडीत कालचा मुक्काम झाला. पंचेचाळीस इतर छोट्या-मोठ्या दिंड्या निवृत्तिनाथांच्या दिंडीत सामील झाल्यानंतर दिंडीतील वारकरी भाविकांची संख्या पंच्याऐंशी हजारांहून अधिकची आहे. यात यंदाच्या वर्षी महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

राज्यभर मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही कमालीच्या गारवा अन पावसाची संततधार होती. मात्र वारकऱ्यांच्या उत्साहात किंचितही फरक जाणवत नव्हता. पंढरपूरच्या अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आल्यानंतर

वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. ‘भेटी लागी पंढरीनाथा मना लागली तळमळ व्यथा’ अशाप्रकारे भाविकांची अवस्था झाली असून कधी एकदा पंढरपूरच्या वाळवंटात जाऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या चरणी माथा ठेवून अवघा शीनभाग विसरतो अशा व्यथा वारकऱ्यांनी बोलून दाखवल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी संस्थानचे अध्यक्ष ॲड. नीलेश गाढवे, हभप नारायण मुठाळ, सोमनाथ घोटेकर, अमर ठोंबरे, कांचनताई जगताप आदीसह वारकरी भाविक उपस्थित होते.

आज वाखरीत वैष्णवांची मांदियाळी.

उद्या (ता.२८) वाखरीत सर्व दिंड्याचा लवाजमा एकत्र होणार आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, तुकाराम आदी संतांच्या दिंड्यामधील लाखों वारकऱ्यांच्या राहुट्या वाखरीच्या मैदानात दाखल होणार आहे.

भजन, कीर्तन, विठ्ठलाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमणार आहे. अनेक कीर्तनकार, संत महात्म्यांसह वैष्णवांचा मेळा भरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुसळधार पावसामुळे अकरावी प्रवेशाची मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढवली!

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT