kotamgaon
kotamgaon Sakal
नाशिक

भाविकांविना प्रतिपंढरपूर समजले जाणारे कोटमगाव आषाढीला सुनेसुने!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : लाखभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी… सुमारे शंभर ते दीडशे दिंड्यांचे आगमन आणि भव्य-दिव्य भरलेली यात्रा… अशा वातावरणात प्रतिपंढरपूर म्हणजेच कोटमगाव विठ्ठलाची येथे भरणारी यात्रा आज सुनीसुनी दिसली. आषाढी एकादशी निमित्त येथे आज मंदिर बंद होते मात्र भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी लाखात असणारी गर्दी मात्र हजाराच्या आसपासच मर्यादित राहिली. (ashadhi-ekadashi-celebrations-canceled-at-vitthal-mandir-kotamgaon-yeola)

परमेश्वरावरील नितांत श्रद्धा असली की मंदिर उघडे पाहिजेच असे काही नाही. याचा प्रत्यय आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे येथे आला. येथील श्री विठ्ठल मंदिर सलग दूसऱ्या वर्षी करोनामुळे आषाढी एकादशीलाही बंद राहिले. येथील यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयाची उलाढाल ठप्प झाली.


ऐतिहासिक धार्मिक पार्श्‍वभूमीमुळे येथे आषाढी एकादशीला दरवर्षी यात्रोत्सव भरतो तर नाशिक, नगर, औरंगाबाद येथून शेकडो दिंड्यांतून लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येथे येत असतात. यंदा मात्र मंदिराला कुलूप असल्याने आलेल्या मोजक्या भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले. आज पहाटे ३ वाजता ग्रामस्थ राजेंद्र काकळीज व अरूण धनगे यांनी सपत्नीक विधीवत विठ्ठलाची पुजा केली. या प्रसंगी अध्यक्ष गणपत ढमाले, पंढरीनाथ पाटील,सोपान ढमाले, तुळशीराम कोटमे,भागवत मोरे, सरपंच सोनाली कोटमे, अंजना नरवडे, संजय नरवडे, रामेश्‍वर तांदळे, भगवान तांदळे, भूषण बिलोरे, ग्रामसेवक सुजाता परदेशी आदी उपस्थित होते.

दिवसभरात शहर व परिसरातील काही भाविक दर्शनासाठी येत होते.मात्र येथील स्थानिक प्रशासनाने मंदिर कुलूप बंद करुन भाविकांनी गर्दी करु नये,असे आवाहन केल्याने भाविक अंतराअंतराने बाहेरुनच दर्शन घेताना दिसले. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी यात्रा यंदाही कोरोनामुळे रद्द करण्याचा व मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येथील यात्रोत्सवात नारळ, पुजा साहित्य, प्रसाद, मिठाई आदींची मोठी रेलचेल असते.यंदा येथे एकही दुकान दिसले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले असून ग्रामपंचायतीस मिळणार्‍या उत्पन्नातही सलग दुसर्‍या वर्षी मोठी घट येणार आहे.



"आज पहाटे विधिवत महापूजा करण्यात आली तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले. विठूमाऊली भेटीसाठी जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला होता.आषाढी एकादशीला दहीहंडी फोडली जाते, तिचा पहिला मान कोटमगावला असून त्यानंतर पंढरपूर येथे दहीहंडी फोडली जाते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला प्रतिपंढरपूर म्हटले जाते. मोठी महती असूनही आज मंदिर बंद ठेवावे लागले."
- सोनाली कोटमे, सरपंच, कोटमगाव विठठलाचे


(ashadhi-ekadashi-celebrations-canceled-at-vitthal-mandir-kotamgaon-yeola)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT