Ashadhi Wari 2023 Bus Arrangement esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023: विठूमाऊलीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरसाठी रविवारपासून जादा बस

भाविकांच्या सेवेत ४ जुलैपर्यंत २९० बसगाड्या

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला यात्रा कालावधी दरम्‍यान महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या जाणार आहेत.

रविवार (ता.२५) पासून ४ जुलैपर्यंत नाशिक विभागातून २९० बसगाड्या भाविकांच्‍या सेवेसाठी सोडल्‍या जाणार आहेत. या संदर्भात महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन आखण्यात आले आहे. (Ashadhi Wari 2023 290 msrtc bus till 4 july for Pandharpur from Sunday nashik news)

पंढरपूर यात्रा आषाढ शुद्ध सप्तमीनिमित्त रविवार (ता.२५) पासून ४ जुलै या कालावधीत यात्रा भरणार असून, गुरुवार (ता.२९) चा आषाढी शुद्ध एकादशीचा दिवस यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.

ही गोष्ट लक्षात घेता नाशिकमधील विविध आगारांतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्‍या सेवेसाठी यात्रा कालावधीत २९० जादा बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत.

नाशिक एक आणि नाशिक दोन या आगारातील बसगाड्या महामार्ग बसस्‍थानक येथून सुटतील. याशिवाय मालेगाव आगारात मालेगाव नवीन बसस्‍थानक, रावळगाव येथून. सटाणा आगारातील नामपूर, देवळा, ताहाराबाद, सटाणा, मनमाडच्‍या मनमाड व चांदवड, सिन्नर डेपोच्‍या सिन्नर व वावीतून, लासलगाव आगारातील जादा बस लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी येथून सुटणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नांदगाव आगारातून जादा बसगाड्या उपलब्‍ध असतील. इगतपुरी आगारातील जादा बस इगतपुरी व घोटी येथून सुटतील. येवला, पेठ आगारातून जादा बस उपलब्‍ध असतील.

कळवण, वणी या ठिकाणावरून कळवण आगाराच्‍या तर पिंपळगाव बसवंत आगाराअंतर्गत ओझर व पिंपळगाव बसवंत येथून जादा बस भाविकांच्‍या सेवार्थ उपलब्‍ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT