ST Bus esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023 : पंढरपूर यात्रेसाठी मागेल तिथून बसची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीसाठी तालुक्यासह कसमादेतील हजारो भाविक दिंडी यात्रेने पंढरपूरकडे जात आहेत. २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर हजारो भाविक बसने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात.

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी येथील आगाराने मागेल तिथून बसची सुविधा हा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान येथील आगारातून २३ जूनपासून मालेगाव ते पंढरपूर बसेस धावणार आहेत. (Ashadhi Wari 2023 Bus facility from demanded place for Pandharpur Yatra nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंढरपूरला जाण्यासाठी किमान ४० ते ४५ प्रवासी एकत्र आल्यास थेट मागेल त्या ठिकाणाहून बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यांना त्यांच्या गावातून देखील बस उपलब्ध करून दिली जाईल.

४० ते ४५ प्रवासी एकत्र आल्यास गावातून थेट पंढरपूरला व पंढरपूरहून थेट गावात आणून पोचविले जाईल. या उपक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील आगारातून २३ ते २६ जून या कालावधीत रोज तीन तर २७ जूनपासून दिवसभरात दहा जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

बसस्थानकातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन तत्काळ बसेस पंढरपूरसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आगाराकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT