After resting the burdens of all the saints in the ground of Vakhri, the Vaishnava Maha Mela held the round Ringan. esakal
नाशिक

Ashadhi Wari 2023: वेढा वेढा रे पंढरी! मोर्चे लावा भीमातिरी! वाखरीत दिंड्या विसावल्या

ज्ञानेश्वर गुळवे

वेढा वेढा रे पंढरी ! मोर्चे लावा भीमातिरीं

चलाचला संत जन ।करु देवासी भांडण

लुटालुटा पंढरपूर ।धरा रखुमाईचा वर

तुका म्हणे चला चला ।घाव निशानी घातला

Ashadhi Wari 2023 : पुंडलिकावरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...! ज्ञानबा-तुकाराम चा गाजर करीत आज सर्वच दिंड्या वाखरीत दाखल झाल्या आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज गुरु शिष्य भेट झाली.

त्याच बरोबर मुक्ताबाई आणि सोपानकाका या बहीण भावाच्या भेटीने वातावरण गहिवरून गेले होते. त्यामागोमाग जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या दिंडीच्या आगमनाने तर वारकरी भक्तिरसात न्हावून निघाले संपूर्ण वाखरीचे भव्य मैदान नव्हे तर पंढरी नगरी जयघोषाने दुमदुमून गेली होती.

वाखरीत जणू वैष्णवांचा महामेळा भरला होता. अभिमान सोडून अवघे जण एक मेका पाया पडतात. (Ashadhi Wari 2023 dindi rested in Vakhri nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रिंगणाच्या वेळी तीन थर लावून मृदुंगाच्या तालावर रंगून गेलेले वारकरी भाविक.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या पात्रात स्नानानंतर सुचिर्भूत होवून पाडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी गोपाळपुऱ्याहून दर्शनबारीसाठी रांगा लावल्या होत्या. अवघे पंढरपूर झाले माऊलीमय...!

आषाढी-कार्तिकीला वाट पाहे उभा भेटीची आवडी,कृपाळू तातडी उतावीळ या संतांच्या वचना प्रमाणे विठुराया आषाढी देवषयनी एकादशीला आपल्या लडिवाळ भक्तांची वाट पाहत असतो.

त्याचप्रमाणे नित्यनेमाने वारी करणारे भक्तही दिंड्या पताकांचे भार वैष्णव नाचती. विठूनामाचा गजर करीत अवघी पंढरी नगरी माऊलींमय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

रिक्षातून प्रवास करणाऱ्या आजीबाईला लुटणाऱ्या चौघी जेरबंद! बुडालेल्या समर्थ बॅंकेच्या लॉकरमधून पैसे घेऊन जात होत्या घरी, वाढदिवसाच्या दिवशीच चोरी

SCROLL FOR NEXT