Ashish Shelar esakal
नाशिक

Ashish Shelar : सत्तेत असो वा नसो हिंदू जागरण करणारच : आशीष शेलार

जातीय दंगलीमागील सत्य चौकशीतून बाहेर येणारच

सकाळ वृत्तसेवा

Ashish Shelar : राज्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या जातीय दंगलीमागे कटकारस्थान असल्याचा संशय असून, चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला.

हिंदू जागरण हे आमच्या पक्षाचे काम आहे. सत्तेत असो वा नसो आम्ही हे काम करणारच, असे ठाम स्पष्टीकरण दिले. (Ashish Shelar press statement Whether in power or not Hindus will wake up nashik news)

मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्यकाळातील माहिती देण्यासाठी भाजपतर्फे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार शेलार बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत राज्यात दंगली घडत आहेत.

त्यामागे कटकारस्थान असल्याचा संशय आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईलच.

राज्यात ठिकठिकाणी हिंदू जनजागरण मोर्चे काढले जात आहेत. त्याचे समर्थन करताना भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले. हिंदूंचा जनजागरण करणे हे आमचे काम आहे.

सत्तेत असो वा नसो आम्ही ते करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेल्या शुभेच्छा राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहेत. त्यावर शेलार यांनी वाढदिवसानिमित्त फक्त शुभेच्छा दिल्याचे सांगितले.

भाजपतर्फे मोदी सरकारची विकासकामे लोकांपर्यंत पोचण्यासाठी अभियान सुरू आहे. ते देशातील सर्वांत मोठे अभियान आहे. लोकांना हिशोब द्यायचे हे काम आहे. काँग्रेसकडून कधीच स्पष्टपणे केलेल्या कामांचा जबाब दिला गेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लोकांचा प्रतिसाद कसा आहे, यासाठी महाजनसंपर्क अभियान राबवीत आहोत. त्याला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही व त्यांना आता गांभीर्याने देखील घेत नाही, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील का, यावर थेट बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले.

‘त्या’ जाहिरातीवरून कानावर हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून देशात नरेंद्र व राज्यात एकनाथ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून नाराजी व्यक्त होत असताना यावर मात्र शेलार यांनी काही बोलण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात अर्थ नाही. नाशिक महापालिकेत महिन्याभरापासून आयुक्त नाही, हा गंभीर विषय असल्याचे ते म्हणाले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT