जाहिरातदार संस्था आहे, कृपया बातमी फोटोसह घ्यावी
फोटो-10295
पिंपळगाव बसवंत ः स्व. अशोक बनकर पतसंस्थेच्या सभासदांना लाभांशाचे वाटप करताना आमदार दिलीप बनकर. शेजारी अध्यक्ष रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे आदी.
स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेतर्फे १५ टक्के लाभांश
आमदार बनकरांच्या हस्ते लाभांश वाटप; ९६ लाख ७९ हजारांचा निव्वळ नफा
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. १ ः येथील स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम राखत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेने तब्बल ९६ लाख ७९ हजार ७८१ रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश वितरित करण्याचा प्रारंभ संस्थेचे संस्थापक तथा आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाला. पतसंस्थेच्या सभागृहात लाभांशवाटप झाले.
संस्थेच्या आर्थिक यशाचा आलेख सातत्याने उंचावत असून, मार्च २०२६ अखेर संस्थेकडे १३४ कोटी ३४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर संस्थेचे खेळते भागभांडवल २०६ कोटी ६९ लाख झाले आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने सातत्याने ‘अ’ वर्ग ऑडिट दर्जा कायम राखत सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता जपली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांनी दिली.
संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचे योगदान मोलाचे असून, सभासदांनी संस्थेवरील विश्वास कायम ठेवत सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांनी केले.
आमदार दिलीप बनकर, सोहनलाल भंडारी, अध्यक्ष रामभाऊ माळोदे, उपाध्यक्ष अरविंद जाधव, कार्यकारी संचालक गणेश बनकर, जनसंपर्क संचालक दिनेश बागरेचा, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब बनकर, चंद्रकांत राका, शंकरलाल ठक्कर, गफ्फार शेख, राजेंद्र खोडे, भूषण धनवटे, स्वप्नील शहा, सागर मोरे, राजेंद्र साळवे, अरुण घोटेकर आदींसह संस्थेचे सभासद, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----