नाशिक

भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

CD
अशोक खरातला न्यायालयीन कोठडी कांदा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : व्यापारवृद्धीचे आमिष आणि दैवीशक्तींची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला आर्थिक फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात शुक्रवारी (ता. ९) जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. न्या. बाबर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. गौळाणे शिवारातील ६० लाख रुपये किमतीची जमीन दैवीशक्तींच्या चमत्काराची भीती दाखवून केवळ २२ लाख रुपयांत खरेदी केल्याचा, तसेच पुन्हा प्लॉट घेण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप खरातवर आहे. या प्रकरणी एका कांदा व्यापाऱ्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्यात पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांचीही व्यापारात मोठी वाढ होण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा खरातवर आरोप आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे अडीच लाख रुपये रोख घेतल्याचे, तसेच ‘सिद्ध खडा’ असल्याचे सांगून बनावट अंगठी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात खरातला चार दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

SCROLL FOR NEXT