नाशिक

खरातच्या दोषनिश्चितीवर २७ ला सुनावणी

CD
खरातच्या दोषनिश्चितीवर आता २७ ला सुनावणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांच्या शोषणासह फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात याच्यावरील दोषनिश्चितीवर २७ तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. भोंदू खरात याने स्वतःला दैवी अवतार सांगत पीडित महिलांवर अत्याचार केला होता. या प्रकरणी गेल्या १७ मार्च २०२६ ला सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्या अटकेनंतर एकापाठोपाठ एक नऊ गुन्हे खरातविरोधात दाखल झाले होते. यात आठ गुन्हे अत्याचाराचे, तर दोन गुन्हे फसवणुकीचे सरकारवाडा पोलिसांत दाखल आहेत. आत्तापर्यंत आठ गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांत दोषारोपपत्र सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले असून, अजून दोन दोषारोपपत्रे दाखल होणार आहेत. शोषणप्रकरणी खरातने जामिनासाठी धाव घेतली असून, त्यास सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे. खरातविरोधात दोषनिश्चितीची नियमित सुनावणीदरम्यान मंगळवारी (ता. २१) सरकार पक्षातर्फे नमुना दोषनिश्चिती दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यावरील सुनावणी २७ तारखपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ॲड. राहुल कासलीवाल खरातच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT