फोटो -NSK26H31476
नाशिक : ‘अशोका मेडिकव्हर’मध्ये अत्याधुनिक तपासणी सुविधांसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदप्रसंगी डॉ. सोहम दोषी, डॉ. संदीप पाटील, डॉ. अमोल शिंदे व हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी.
‘अशोका मेडिकव्हर’मध्ये
अत्याधुनिक तपासणी सुविधा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : वारंवार होणारे आम्लपित्त, छातीत जळजळ, आंबट ढेकर, अन्न किंवा आम्ल घशात येणे तसेच औषधोपचारानंतरही कायम राहणाऱ्या रिफ्लक्सच्या तक्रारींचे अधिक अचूक निदान करण्यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये २४ तासांची पीएच-मेट्री व इम्पीडन्स तपासणी सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पीएच-मेट्रीद्वारे अन्ननलिकेत २४ तासांत होणाऱ्या आम्लाच्या परतीच्या प्रवाहाचे निरीक्षण केले जाते. त्यामुळे रुग्णाला जाणवणाऱ्या लक्षणांचा रिफ्लक्सशी संबंध आहे का, हे समजण्यास मदत होते. इम्पीडन्स तपासणीद्वारे आम्लयुक्त तसेच आम्लविरहित द्रव आणि वायूच्या परतीच्या प्रवाहाची नोंद करता येते. त्यामुळे उपचारांचे योग्य नियोजन करणे शक्य होते. पचनसंस्था विकार तज्ज्ञ डॉ. सोहम दोषी, डॉ. संदीप पाटील आणि डॉ. अमोल शिंदे यांनी या तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. औषधोपचारानंतरही तक्रारी कायम असलेल्या रुग्णांमध्ये समस्येचे नेमके कारण शोधण्यासाठी ही तपासणी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी म्हणाले, रुग्णांना आधुनिक निदान सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सुविधेमुळे रिफ्लक्सच्या समस्यांचे अधिक अचूक मूल्यमापन करून उपचारांचे नियोजन करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.