Asphalt melting esakal
नाशिक

Nashik: सिन्नरच्या रस्त्यावर डांबराचा चिखल! जुन्या नाशिक-पुणे महामार्गाच्या दुरुस्ती कामात ठेकेदाराची धूळफेक उघड

अजित देसाई

Nashik News : सिन्नर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या रस्त्यावर संगमनेर नाका ते बस स्थानक दरम्यान पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून डांबर फवारण्यात आले होते.

बुधवारी कडकडीत उन्हामुळे हे डांबर वितळून रस्ता निसरडा झाला व अनेक दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. (Asphalt on road of Sinnar contractors dust exposed in repair work of old Nashik Pune highway)

सिन्नर शहरातून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

साडेआठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कामाची गुणवत्ता खराब असल्याचे नागरिकांच्या तक्रारीतून वारंवार सांगण्यात आले. मात्र या दुरुस्ती कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

महिनाभरापासून संपूर्ण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. असे असताना पावसात काम केल्यामुळे काही ठिकाणी कामाची गुणवत्ता ढासळली असेल अशी पाठराखण अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

बस स्थानक ते संगमनेर नाका दरम्यान दुरुस्ती कामानंतर देखीलर स्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले ते खड्डे बुजवण्यासाठी व गेल्या कामाची गुणवत्ता झाकण्यासाठी ठेकेदाराने डांबर फवारून रस्ता अधिक गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ठेकेदाराची ही बनवेगिरी आणि धूळफेक बुधवारी पडलेल्या रखरखीत उन्हामुळे चव्हाट्यावर आली. उन्हामुळे डांबर वितळून अक्षरशः चिखल तयार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे निसरड्या झालेल्या या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना अनेक दुचाकी स्वार घसरले. चार चाकी वाहने देखील स्लिप होऊ लागली. अतिशय हळुवारपणे मार्गक्रमण करत वाहनांची ये जा दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच होती.

रस्त्याच्या दुरुस्ती कामावेळी ठेकेदाराने गुणवत्तेचे निकष पाळले नाही. त्यामुळे लवकरच रस्त्यात खड्डे पडले. त्यात डांबर फवारणी करण्यात आल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

या संपूर्ण दुरुस्ती कामाची चौकशी करावी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्ती कामावर देखरेख होती. वाहतुकीची वर्दळ आणि गॅस लाईनच्या कामामुळे दुरुस्ती कामात अडथळे आले होते.

बसस्थानक ते संगमनेर नाका दरम्यान विरघळलेल्या डांबरावर कच पसरवण्यात येईल त्यामुळे हे काम अधिक भक्कम होईल असे उप अभियंता वाय. ए. पाटील यांनी दैनिक सकाळची बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

IND vs IRE, T20I: पोरं तर पोरं, आयर्लंडच्या पोरींनी पण भारताला हरवल्याचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; Video Viral

Latest Marathi News Live Update : महापौर हिमगौरी आडके अतिक्रमणांविरोधात रस्त्यावर, अनधिकृत बांधकामांवर थेट कारवाई

Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

SCROLL FOR NEXT