A student injured in an assault. esakal
नाशिक

Nashik Crime: शालेय विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरातील वाढते गुन्हेगारी, गुंडगिरीचे लोन आता शाळा महाविद्यालयापर्यंत पोचले आहे. किरकोळ वादातून तसेच वर्चस्वातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ले होत आहे.

बुधवारी (ता. १२) अशा प्रकारे रविवार कारंजा येथील एका शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. (Assault on school students Nashik Crime)

बुधवारी रविवार कारंजा येथील एका शाळेच्या बाहेर श्रमिकनगर गंजमाळ येथील शहानवाज मन्सूर शहा (१५) या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. त्यात विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.

इतकेच नाही तर चोरी, मारहाण, प्राणघातक हल्ले यासाठीही शाळेतील अल्पवयीन मुले विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून वापर केला जात आहे. यास वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात भयानक परिस्थिती उद्भवण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विविध गुन्हेगारी घटनांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गुन्हेगारी घटनांकडे आकर्षित केले जाते. यात शाळकरी मुलांचा देखील समावेश असतो. यावर कारवाई झाली नाही तर भविष्यात हेच प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

"अल्पवयीन मुले तसेच शाळकरी विद्यार्थी यांच्याकडे पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची संगत यावर विशेष लक्ष द्यावे. शाळा प्रशासनाने देखील शाळेबाहेर सुरक्षारक्षक नियुक्त करावे. पोलिसांची नियमित गस्त सुरू असते. तरीदेखील अडचण आल्यास त्वरित संपर्क साधावा." - गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT